AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके आणि इतर घटक मिश्रण करताना घ्यावयाची काळजी!
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके आणि इतर घटक मिश्रण करताना घ्यावयाची काळजी!
• पिकामध्ये फवारणी करताना वेळची बचत, मजुरांचा आणि फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचा खर्च वाचवण्यासाठी आपण बऱ्याच वेळी कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्ये खत, पीक पोषके आणि स्टिकर अश्या अनेक घटकांचा आपण एकत्रित वापर करतो. • परंतु या सगळ्या रासायनिक घटकांचे द्रावण करताना त्यांच्या मिश्रणाची सुसंगता आणि त्याचा पिकावर होणारा परिणाम याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नसल्यामुळे आपल्याला अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. • जसे कि असुसंगत औषधे एकत्र मिसळल्याने द्रावण फुटून खराब होणे, पाण्यात विरघळण्याची क्षमता कमी होणे, मिश्रणाचे गोळे तयार होणे, मिश्रण ज्वलनशील अथवा स्फोटक होणे, रासायनिक घटकांची अभिक्रिया होऊन औषधांचे विघटन होते. यामुळे औषधांची तीव्रता कमी होऊन पिकावर त्याचा काहीच परिणाम दिसून येत नाही त्यामुळे यावर केला जाणारा खर्च वाया जातो. • याउलट मिश्रण अधिक क्रियाशील झाल्यास झाडाची पाने करपणे, झाड सुकणे, पानगळ होणे यांसारख्या अनेक समस्या आपल्याला पिकात अथवा मिश्रण करताना दिसून येतात. • यासाठी रासयनिक घटकांचे काळजीपूर्वक मिश्रण करणे गरजेचे आहे. रासायनिक औषधांचे मिश्रण तयार करण्यासाठी पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात. • टॅंक मिश्रण तयार करण्यासाठी प्लास्टिक भांड्याचा वापर करावा. धातूंपासून बनलेल्या भांड्याचा वापर करणे टाळावे. • कीटकनाशक बुरशीनाशक व इतर रासायनिक घटकांसोबतचे माहिती पत्रक वाचून ते औषधे टँक मिश्रण करण्यासाठी शिफारस केले आहे की नाही याची खात्री करावी व शिफारस केल्यानुसार मिश्रण तयार करावे. • मिश्रणामध्ये सर्व औषधे शिफारशीत मात्रेचाच वापर करावा. • मिश्रण करतांना औषधांची क्रमवारी पुढील प्रमाणे तंतोतंत पाळावी. 1. प्रथम टॅंक मधील स्वछ पाण्यात पावडर, भुकटी, दाणे युक्त औषधे टाकावीत व मिश्रण लाकडी काठीने ढवळत राहावे. यामध्ये WP - DF - WP - WG/WDG - SP - SG फॉर्मुलेशन असणारी औषधे दिलेल्या क्रमानुसारच एकत्र करावीत. 2. दुसऱ्या टप्यात पाण्यात वाहणारे म्हणजे लिक्विड औषधे टाकावीत यामध्ये CS - SC - FL - SL- EC - SE फॉर्मुलेशन असणारी औषधे दिलेल्या क्रमानुसारच एकत्र करावीत व द्रावण काठीने हलवावे. 3. तिसऱ्या टप्प्यात तयार द्रावणात स्टिकर, स्प्रेड्रर चा वापर करावा. 4. चौथ्या टप्प्यात तेलवर्गीय तरंगणारे औषध टाकावे जसे OD फॉर्मुलेशन असणारे (उदा - निम तेल) घटक. 5. शेवटच्या म्हणजे पाचव्या टप्प्यात विद्राव्ये खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. 6. मिश्रण तयार करताना 2 ते 3 पेक्षा जास्त औषधे एकत्र करणे टाळावे. अशाप्रकारे तयार केलेले मिश्रण पिकावर वापरण्यासाठी योग्य असेल. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
59
18