AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राशनकार्ड मध्ये जोडता येणार नवीन सदस्यांचे नाव!
समाचारAgroStar
राशनकार्ड मध्ये जोडता येणार नवीन सदस्यांचे नाव!
👉🏻रास्त धान्य दुकानात केंद्र सरकार देशातील 80 कोटींहून अधिक गरीब लोकांना दरमहा अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना चालवत आहे. योजनेनुसार रेशन कार्डधारकांना कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार निश्चित धान्य मिळते. आता तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव टाकून जास्तीचे धान्य मिळू शकते. कारण तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डवर नवीन सदस्याचे नाव टाकू शकता. 👉🏻शिधापत्रिकाधारकांना कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार धान्य मिळते. शिधापत्रिका फक्त धान्य मिळवण्यासाठी वापरली जात नाही, तर रेशनकार्ड हे ओळखपत्र म्हणूनही काम करते. बँक खाते उघडण्यापासून ते सरकारी योजना आणि खासगी योजनांसाठी रेशन कार्डचा वापर ओळख म्हणून करता येतो. 👉🏻शिधापत्रिकेवर या किमतीत रेशन मिळते केंद्र सरकार शिधापत्रिकाधारकांना प्रति युनिट 5 किलो गहू आणि तांदूळ मोफत देते. म्हणजेच तुमच्या घरात जर 5 सदस्य असतील तर प्रत्येक सदस्याला 5 किलो गव्हानुसार दर महिन्याला 25 किलो गहू आणि तांदूळ मिळेल. याशिवाय राज्य सरकार रेशनकार्डवर प्रति युनिट अन्नधान्याव्यतिरिक्त मीठ, तेल इत्यादी देत आहे. 👉🏻शिधापत्रिकेवर नवीन नाव कसे टाकायचे? मूल जन्माला येते किंवा नवविवाहित स्त्री घरात प्रवेश करते तेव्हाच राशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडले जाते. नाव जोडण्यासाठी विवाह प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असतो. 👉🏻शिधापत्रिकेत नाव टाकण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करु शकता - सर्वप्रथम जवळच्या CSC केंद्राला भेट द्या किंवा तुमच्या राज्याच्या अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. - वेबसाइटवर जा आणि फॉर्म क्रमांक 3 डाऊनलोड करा. - आता फॉर्म-3 मध्ये शिधापत्रिकेची संपूर्ण माहिती भरा, तसेच ज्या व्यक्तीचे नाव जोडायचे आहे, त्याच्या प्रमुखाची माहिती भरा. - भरलेल्या फॉर्मसोबत अंगठ्याचा ठसा किंवा सही करा. - फॉर्म भरल्यानंतर तो CSC केंद्र किंवा अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करा. - त्यानंतर फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतर शिधापत्रिकेत नवीन अपडेट होईल. - शिधापत्रिकेत नाव टाकण्यासाठी तुम्ही ऑफलाइन अर्जही करु शकता. 👉🏻रेशन कार्डमध्ये नवीन नाव अपडेट ऑनलाइन अर्ज करु शकत नसाल, तर तुम्ही ऑफलाइनही अर्ज करुु शकता. - यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या शहरातील पालिका किंवा MCD कार्यालयात जावे लागेल. येथे - तुम्हाला रेशन कार्ड फॉर्म क्रमांक-3 मिळेल. - आता फॉर्म काळजीपूर्वक भरा. यामध्ये मागितलेली सर्व कागदपत्रे जोडावीत. - फॉर्म भरल्यानंतर कार्यालयात जमा करा. - फॉर्म सबमिट केल्यानंतर, पडताळणी होईल आणि त्यानंतर शिधापत्रिकेत नवीन नाव जोडले जाईल. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
107
0