AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात' पुन्हा गारपिटीचे संकट!
हवामान अपडेटतरुण भारत
राज्यात' पुन्हा गारपिटीचे संकट!
➡️ सध्या राज्यात हवामान कोरडे झाले असून, तापमानात अंशत : वाढ झा ली आहे. तापमानात वाढ झाली,असली तरी वातावरणात गारठा अद्याप कायम आहे. ➡️ मात्र खान्देश , विदर्भ , मध्य महाराष्ट्रा त आगामी दोन दिवस दाट धुके, तर 21 आणि 22 जानेवारीला खान्देशासह विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. ➡️ राज्यात सोमवारी गोंदिगों या जिल्ह्यात ११ अंश सेल्सियस तापमानाची नोंदनों करण्यात आली. आगामी काही दिवस खान्देशमध्ये थंडी काहीशी अधिक, तर कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रा त सातारा , सांगली , कोल्हापूर ,सोलापूरमध्ये थंडी कमी जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ➡️ उर्वरित महाराष्ट्रा त हळूहळू ढगाळ वातावरण निवळण्याचीही अपेक्षा आहे. रब्बी पिकासाठी आठवडाभर वातावरण काहीसे पूरक असेल. खान्देशातील धडगाव, अक्कलकुवा, अकराणी, शहादा, शिरपूर, चोपडा, रावेर, यावल तसेच विदर्भातील जामोद,धामणी,चिखलदरा, वरूडपर्यंत व सभोवतालच्या परिसरात पुढील दोन दिवस दाट धुके असणार आहे. तर 21 आणि २२ जानेवारीला तुरळक ठिकाणी किंचितशी गारपीटही होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संदर्भ:-तरुण भारत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
53
10
इतर लेख