AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटAgrostar
राज्यात पावसाचा मुक्काम वाढला!
👉🏻महाराष्ट्रात गेल्या दहा ते अकरा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. 8-9 तारखेला महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. काही ठिकाणी सात मेला देखील पावसाने हजेरी लावली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत राज्यात भाग बदलत वादळी पाऊस सुरू आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण म्हणजेच महाराष्ट्रात सगळीकडेच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. 👉🏻राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी वाढणार आहे. शुक्रवारपर्यंत (२४ मे) मराठवाडा, विदर्भात सर्वांत अधिक अवकाळी पाऊस पडणार असून, मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपीट, तर कोकणात गरमी आणि आर्द्रता वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
54
0
इतर लेख