AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात थंडी वाढण्याची शक्यता!
हवामान अपडेटसंदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ
राज्यात थंडी वाढण्याची शक्यता!
➡️ महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागावर १०१४ हेप्टपास्कल इतका अधिक हवेचंदाब या आठवड्यात कायम राहणार असून किमान तापमान घसरत असल्यानंर हवेचे दाब वाढत आहे. थंडीचे प्रमाण काढण्यास गुरुवार दिनांक १६ डिसेंबर पासून सुरवात होईल. ➡️ कोकण - सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ३ ते ७ मी मी पावसाची शक्यता रविवारी व सोमवारी आहे. वाऱ्याची दिशा ईशानेकडून राहील. वाऱ्याचा तशी वेग ६ ते १० कि.मी.राहील. पालघर व ठाणे जिल्हयात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर सिंधुरदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. ➡️ उत्तर महाराष्ट्र - नाशिक व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ते २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील.नाशिक जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ५०ते ५८ टक्के राहील. तर दूरपारची सापेक्ष आद्रता ३३ ते ३९ टक्के राहील. ➡️ मराठवाडा - उस्मानाबाद जिल्ह्यात जेथे हवेचे दाब कमी होतील.त्या भागात रविवारी ४ मी. मी.व सोमवारी ३ मी. मी.. लातूर जिल्ह्यात रविवारी ५ मी. मी. व बीड जिल्ह्यात सोमवारी ३ मी. मी. पावसाची शुद्धता आहे. या तिन्ही जिल्ह्यात हवामान बदल जाणवतील. व काही भागात ढग जमून अल्पशा पावसाची शक्यता आहे. ➡️ पूर्व विदर्भ - गडचिरोली जिल्ह्यात रविवारी अल्पशा पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कमल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ते ३२ अंश सेल्सिअस राहील. ➡️ पश्चिम विदर्भ - अकोला, बुलढाणा , वाशीम व अमरावती जिल्ह्यात कमल तापमान ३१ अंश सेल्सिअस व किमान १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ५२ ते ५५ टक्के व दुपारीची ३२ ते ३३ टक्के राहील. ➡️ मध्य विदर्भ - यवतमाळ वर्धा व नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील व किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.सकाळची सापेक्ष आद्रता ५१ ते ५५ टक्के राहील ➡️ दक्षिण पश्चिम महाराष्ट्र - कोल्हापूर, सांगली, . सातारा, सोलापूर, पुणे, व नगर जिल्ह्यात रविवारी व सोमवारी तुरळक ठिकाणी जेथे हवेचे दाब कमी होतील तेथे ३ते ७ मी. मी. इतका अल्पशा पावसाची शक्यता आहे. संदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
46
7
इतर लेख