AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात काही भागात पावसाची शक्यता!
कृषी वार्ताअ‍ॅग्रोवन
राज्यात काही भागात पावसाची शक्यता!
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागांत पूर्वमोसमीच्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढत असताना उकाड्यात चांगलीच वाढ होत आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा पुन्हा वाढला आहे. पुढील काही दिवस उन्हासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सोमवारी (ता.२४) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअसची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. राज्यात मॉन्सून दाखल होण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. राज्यात वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत. ढगाळ वातावरण आणि पाऊस अशी स्थिती पाहायला मिळत आहे. तर, मध्यरात्रीनंतर हवेत गारवा तयार होत असल्याने पहाटेचा गारवा आल्हाददायक वाटत आहे. मात्र, दिवसभर काही ठिकाणी उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानात चढउतार होत आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअस, तर विदर्भात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. कोकण व मराठवाड्यातील बहुतांशी भागात तापमान सरासरीच्या जवळपास आहे. तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मराठवाड्यातील उस्मानाबाद, मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या चांगल्याच सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी जोरदार वारे वाहत असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून खरिपाची पूर्व तयारी सुरू असल्याने पूर्वमोसमी पावसामुळे अडथळे निर्माण होत आहेत. राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस मंगळवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, संपूर्ण मराठवाडा बुधवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा गुरूवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ शुक्रवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
0
इतर लेख