AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात अनेक भागांत धुक्याची चादर!
हवामान अपडेटAgrostar
राज्यात अनेक भागांत धुक्याची चादर!
➡️आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रत ८ ते १० जानेवारी दरम्यान हवामान कसे असेल आणि त्यानुसार आपल्या पिकांची कश्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती. ➡️महाराष्ट्रातील नेवासा, राहुरी ,श्रीरामपूर, शेवगाव, अकोला,अकोट ,बार्शी टाकळी, पातूर ,तेल्हारा,बाळापूर,धरणी ,गाणगापूर ,वैजापूर,बीड,गेवराई ,शिरूर कासार,वणी,पालम,सोनपेठ,पूर्णा ,मनवठ,पाथरी,परभणी,गंगाखेड,नांदगाव, नांदेड,लोहा,देगलूर,सावनेर,नागपूर,मौडा,कुही,कामठी,कपालेश्वर,हिंगणा,घनसावगी,परतूर,बदनापूर,जालना,अंबड,भुसावळ,यावल,रावेर,पाचोरा,जळगाव,एरंडोल,मुक्ताईनगर,भांडगाव,बसमथ,शिरपूर इत्यादी तालुक्यात तसेच गोंदिया,चंद्रपूर ,भांडारा,बुलढाणा आणि गडचिरोलीमधील काही भागात येत्या काही दिवसांत थंडीचे प्रमाण वाढून पिकांवर इजा म्हणजेच रोग राई होण्याची शक्यता आहे. ➡️या वेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे. पिकावर थंडीचा ताण येऊ नये याकरिता पिकात नायट्रोजन खतांचा वापर कमी करावा.जमिनीत चांगली व पुरेशी आर्द्रता असताना पाणी देऊ नये. ➡️तसेच गार वाऱ्यासह थंडी वाढल्याने भाजीपाला पिकांमध्ये रस शोषक आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, म्हणून पिकावर शटर 40 ग्रॅम/ एकर + रोझताम 240 मिली / एकर या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.तसेच ठिबक असेल तर त्यामधून जैविक खतांचा वापर करावा. ➡️गहू, टोमॅटो, मिरची,वांगी या पिकांच्या चांगल्या वाढीसाठी सल्फर मॅक्स ६ किलो आणि सेल्जिक ३ किलो प्रति एकर वापरावे. ➡️कांदा, लसूण यावरील थ्रिप्स आणि पानावरील डाग रोगाच्या नियंत्रणासाठी मेंटो 7 ग्रॅम + अझेक्स 20 मिली प्रति पंप घेऊन फवारणी करावी. ➡️थंडी मध्ये कमी तापमानामुळे नवीन लागवड केलेल्या केळीच्या बागाची जोमदार वाढ होत नाही यावर उपाय म्हणून शक्य रोपाच्या पोंग्यात विद्राव्य खत 19:19:19 @ 3 ग्रॅम व चिलेटेड मायक्रो नुट्रीएंट @ 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन ओतावे. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
2
इतर लेख