AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्याच्या ग्रामीण जीवनोन्नती योजनेत 'या' पदांसाठी भरती!
नोकरीन्यूज १८ लोकमत
राज्याच्या ग्रामीण जीवनोन्नती योजनेत 'या' पदांसाठी भरती!
➡️महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जालना इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कार्यरत तज्ञ, मार्गदर्शक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची ०७ फेब्रुवारी 2022 तारीख असणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कार्यरत तज्ञ - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मार्गदर्शक -या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार कार्यरत तज्ञ -उमेदवारांना सात दिवसांच्या सेवेसाठी किमान ५००० रुपये मानधन देण्यात येणार आहे. मार्गदर्शक - उमेदवारांना सात दिवसांच्या सेवेसाठी किमान ५००० रुपये मानधन देण्यात येणार आहे. या पदभरतीसाठी उमेदवाराचं वय हे 24 ते 68 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक 1)Resume (बायोडेटा) 2)दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं 3)शाळा सोडल्याचा दाखला 4)जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) 5)ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) 6)पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियान (MSRLM-उमेद) जिल्हा अजियान व्यवस्थापन कक्ष जालाना , जालना पंचायत समितीच्या पाठीमागे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA), जालना – 431203. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
4