AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्य शासन राबविणार एक हजार कोटी रूपयांचा मॅन्गेट प्रकल्प
कृषि वार्तापुढारी
राज्य शासन राबविणार एक हजार कोटी रूपयांचा मॅन्गेट प्रकल्प
पुणे- राज्य सरकारच्या पुढाकाराने व आशियाई विकास बॅंक अर्थसाहाय्यित ‘महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क’ (मॅन्गेट) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सुमारे एक हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून, विविध १० पिकांच्या मूल्यसाखळया विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. या प्रकल्पांतून शेतकरी उत्पादक समूहांना व कृषी व्यावसायिकांना व्यापक स्वरूपात संधी निर्माण होणार असल्याची माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी दिली.
मॅग्नेट प्रकल्पात राज्यातील केळी, डाळिंब, सीताफळ, संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी, हिरवी व लाल मिरची या प्रमुख फळे व भाजीपाला मिळून एकूण १० पिकांच्या मुल्यसाखळया सक्षम करण्यात येणार आहेत. त्यासाठी आशियाई विकास बॅंकेचे प्रकल्प समन्वयक अधिकारी मासाहीरो निशीपुरा, नैसिर्गिक संसाधने व कृषीतज्ज्ञ सुने किम, प्रकल्प अधिकारी क्रिशनसिंग रोटेला व कृषी पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी २४ व २५ ऑगस्ट रोजी नाशिक, इंदापूर, कंदर, अकलूज येथील निवडक शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, निर्यातदार व पायाभूत सुविधांना भेटी दिल्या आहेत. _x000D_ संदर्भ – पुढारी, १६ सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
12
0
इतर लेख