कृषि वार्ताAgroStar
रंगांच्या आधारावर औषधांची ओळख करा!
💢शेतकरी बांधव विविध प्रकारच्या रसायनांचा वापर करतात जेणेकरून पिकांचे कीटकांपासून संरक्षण होईल. पिकांच्या उत्तम उत्पादनासाठी या रसायनांचा वापर करणे खूपच आवश्यक असते. मात्र, अनेकदा शेतकरी कोणत्याही प्रकारचे रसायन वापरतात, ज्यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि पिकांसाठी ते घातक ठरू शकते. त्यामुळे पिकांच्या प्रकारानुसारच रसायनांचा वापर करावा.
💢कीटकनाशकाबद्दल बोलायचं झालं तर, त्याच्या पॅकेटच्या मागे वेगवेगळ्या रंगांचे चिन्हांकन असते. हे रंग कीटकनाशकाच्या तीव्रतेबद्दल माहिती देतात. हे मुख्यतः लाल, पिवळा, हिरवा आणि निळा रंग असतो. आज आपण या रंगांचा काय अर्थ असतो हे जाणून घेऊया.
💢लाल रंग
लाल रंग हा विषाची तीव्रता मोजण्याच्या स्केलवर सर्वाधिक तीव्रतेचा मानला जातो. जर कोणत्याही कीटकनाशकाच्या पॅकेटच्या मागे लाल रंग असेल, तर तो सर्वात तीव्र कीटकनाशकाच्या श्रेणीत मोडतो.
💢पिवळा रंग
पिवळा रंग विषाची तीव्रता मोजण्याच्या स्केलवर दुसऱ्या पातळीचा धोका दर्शवतो. या कीटकनाशकाचे प्रमाण त्याच्या पॅकेटवर व्यवस्थित दाखवलेले असते.
💢निळा रंग
ज्या कीटकनाशकाच्या पॅकेटवर निळा रंग असतो, ते मध्यम तीव्रतेचे दर्शवणारे असते. शेतकऱ्यांनी हे कीटकनाशक किती प्रमाणात वापरावे, याची माहिती पॅकेटवर दिलेली असते.
💢हिरवा रंग
हिरव्या रंगाचे पॅकेट असलेले कीटकनाशक सर्वात कमी तीव्रतेचे असते. याची तीव्रता खूप कमी असते.
💢पिकांना जितके कीटकनाशक वापरण्याची गरज असते, त्याच प्रमाणातच वापरावे. हे माणूस, प्राणी आणि पिकांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे त्यांचा वापर काळजीपूर्वक करणे अत्यंत आवश्यक आहे.
संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.