AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योग्य वेळेत गहू पिकाची कापणी करणे आवश्यक
कृषि वार्ताAgroStar India
योग्य वेळेत गहू पिकाची कापणी करणे आवश्यक
👉गहू वाणानुसार पेरणीनंतर साधारण 100 ते 120 दिवसांत कापणीस येतो. योग्य उत्पादनासाठी वेळेवर कापणी करणे महत्त्वाचे आहे. कापणीस उशीर झाल्यास ओंबीतील दाणे जमिनीवर पडून उत्पादनात घट येते. त्यामुळे पीक पूर्णपणे पक्व होण्याच्या 2-3 दिवस आधी कापणी करावी. 👉कापणीसाठी दाण्यातील ओलावा सुमारे 15% असावा. सकाळच्या वेळी वातावरणात आर्द्रता असल्याने ओंब्या गळून पडण्याचा धोका कमी होतो, तर दुपारी तापमान वाढल्याने गळतीची शक्यता जास्त असते. कापणी केल्यानंतर पेंढ्या 1-2 दिवस उन्हात वाळवून त्यानंतर मळणी करावी. 👉गहू साठवताना दाणे पूर्ण कोरडे असल्याची खात्री करून योग्य ठिकाणी साठवणूक करावी. यामुळे उत्पादन टिकवता येते आणि नुकसान टाळता येते. योग्य वेळी कापणी आणि साठवणूक केल्यास शेतकरी अधिक चांगले उत्पादन घेऊ शकतात. 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
0
इतर लेख