AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
यावर्षी युरीयाचे उत्पादन 3 दशलक्ष टनाने कमी
कृषि वार्ताअमर उजाला
यावर्षी युरीयाचे उत्पादन 3 दशलक्ष टनाने कमी
ह्या आर्थिक वर्षात, देशातील युरीयाचे उत्पादन 3 दशलक्ष टनांनी कमी होऊन 2.41 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे, कारण काही यंत्रांची दुरुस्ती सुरु आहे, अशी माहिती खत मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तो असे म्हणाला की 2016-17 या वर्षी युरीयाचे उत्पादन देशात 2.44 दशलक्ष टन झाले. या वर्षी युरीयाचे उत्पादन कमी होईल, कारण काही कारखाने बंद आहेत आणि ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी त्यांची दुरुस्ती सुरु आहे.
ह्या कारणामुळे तीन लाख टनांहून कमी युरीयाचे उत्पादन होईल पण याचा परिणाम तात्पुरता असेल. गेल्या दोन वर्षात, युरीयाचे देशातील उत्पादन भरपूर होते, पण 3.2 दशलक्ष टनांच्या वार्षिक मागणीमुळे, तरीही ते कमी पडले. अमर उजाला 27/11/2017
0
0