गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
१९:१९:१९ या विद्राव्य खताचे पिकासाठी फायदे पहा.
यामध्ये कोणते घटक असतात?
नाइट्रोजन (N), फॉस्फोरस (P) आणि पोटॅशिअम (K)
याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते?
👉 हे एक प्रारंभिक दर्जाचे खत आहे.
👉 सर्व ३ स्वरूपांमध्ये N चा चांगला स्रोत: अमाइड, अमोनियाकॅल, आणि नायट्रेट स्वरूपात.
👉 तीन सूक्ष्म पोषक घटकांचा चांगला स्त्रोत असल्यामुळे, ते पिकाच्या प्रमुख पोषण गरजा पूर्ण करण्यास मदत करते.
👉 यांच्यामुळे मुळे चांगली विकसीत होतात आणि कोंबांची वाढ होते.
याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो?
👉 पिकांची सुरुवातीची वाढ जोमदार करते. फुटव्यांची संख्या वाढविते.
👉 पिकामध्ये काळोखी टिकवून ठेवण्याचे काम करते.
👉 पिकांच्या N, P, K गरजांची पूर्तता करण्यासाठी शेतकरी ही प्रत पिकांसाठी वापरू शकतात.
👉 पाण्यात विरघळणारे असल्याने, ठिबक सिंचन किंवा पानांवरील फवारणीद्वारे वापरल्यास सर्वोत्तम परिणाम मिळतात.
कोणत्या पिकांसाठी वापर करावा?
👉 ठिबकद्वारे: द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कांदा, ऊस, आले, हळद, कलिंगड, फुलशेती आणि संरक्षित शेती
👉 पानांवरील फवारणीद्वारे: सर्व पिके
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.