AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
या' ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता!
हवामान अपडेटअ‍ॅग्रोवन
या' ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता!
➡️राज्यात पाऊस वाढण्यास अनुकूल हवामान होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची निर्मिती झाली असून, विदर्भासह राज्यात पाऊस वाढणार आहे. कोकणात बहुतांशी ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ➡️बंगालच्या उपसागरातील तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र मध्य भारताकडे सरकणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती आणि मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे आल्याने पावसाला पोषक हवामान होऊन राज्यात पाऊस वाढणार आहे. ➡️विदर्भाच्या पश्‍चिम परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. सध्या राज्यात हलक्या श्रावण सरी बरसत आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, खानदेशातील जळगाव, विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तुरळक सरी ➡️मंगळवार : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, संपूर्ण राज्य. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
131
11
इतर लेख