AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
या जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची शक्यता
हवामान अपडेटzeenews.india
या जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची शक्यता
➡️शेतकऱ्यांसाठी काहीशी चिंताजनक बातमी आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ➡️हवामान खात्याच्या या अंदाजामुळे शेतातील पीकं सांभाळायची कशी, असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर आवासून उभा राहिला आहे. ➡️हवामान खात्याने विदर्भातील भंडारा जिल्ह्यात येत्या 2 दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच बुधवारी तुमसर इथंही पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी आणखी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाचं सावट ➡️मध्य भारतातील काही ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व विदर्भात अवकाळी पावसाचा धोका उद्भवला आहे. शुक्रवारी 11 फेब्रुवारीला साकोली, लाखांदूर, लाखनी आणि तुमसर या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे याच भागामध्ये अधिक पाऊस होण्याची भिती आहे. संदर्भ:-zeenews.india, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
1
इतर लेख