योजना व अनुदानAgrostar
मोफत शिलाई मशीन योजना!
👉🏻पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणे हा असून, या योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षणाच्या वेळी 15,000 रुपयांच्या अर्थसहाय्यासोबतच 500 रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते.
👉🏻पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक पात्रता:
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे नाव बीपीएल शिधापत्रिकेत आले पाहिजे.
- या योजनेचा लाभ ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 1,60,000 रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनाच मिळू शकते.
- अर्ज करणारी महिला भारताची नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 40 वर्षांपेक्षा कमी असावे.
- ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी करत आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्या महिलांनी आधीच या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना या योजनेसाठी पात्र मानले जाणार नाही.
👉🏻पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- मूळ पत्ता पुरावा
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- दोन फोटो
👉🏻अर्ज भरण्याची प्रोसेस:
- https://pmvishwakarma gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही साईडला लॉगिन या बटणावर क्लिक करून तुमच्याशी CSC रजिस्टर आर्टिस्टन्स येथे क्लिक करून लॉगिन व्हा.
- लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला माहिती विचारली जाईल तिथे नो नो करून पुढे क्लिक करा. यानंतर आधार वेरिफिकेशन करून पुढे जायचे आहे व नंतर बायोमेट्रिक वेरिफिकेशन करायचे आहे.
- यानंतर तुमची पर्सनल डिटेल विचारली जाईल ती योग्य रित्या न चुकता भरून यानंतर आधार एड्रेस विचारला जाईल आधार ऍड्रेस आज तुमचा परमनंट ऍड्रेस आहे काअशाप्रकारे तुम्हाला माहिती विचारीत जाईल योग्य ती माहिती देऊन तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
👉🏻संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.