AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मुरघास कसा तयार करावा
पशुपालनअॅग्रोवन
मुरघास कसा तयार करावा
1) चाऱ्याचे १ ते २ इंच लांबीची कुट्टी यंत्राच्या साह्याने तुकडे करून घ्यावेत. 2) मुरघासासाठी तयार केलेल्या खड्ड्यामध्ये प्लॅस्टीकचा कागद सर्व बाजूंनी व्यवस्थित अंथरून घ्यावा. 3) प्रती टन कुट्टी केलेल्या चाऱ्यावर १ किलो मीठ, २ किलो गूळ आणि १ किलो खनिज मिश्रण १५ लिटर पाण्यामध्ये विरघळून मिश्रण कुट्टीवर व्यवस्थित शिंपडावे चाऱ्याचा थर दाबून घ्यावा. 4) कुट्टी व मिश्रणाचे थरावर थर व्यवस्थित पसरून कुट्टी दाबून घ्यावी जेणेकरून त्यामध्ये हवा राहणार नाही जर हवा आतमध्ये राहिली तर त्यात बुरशी तयार होऊन मुरघासाची प्रत कमी दर्जाची तयार होते. 5) खड्डा व्यवस्थित भरल्यानंतर त्यावर प्लॅस्टीकचा कागद झाकून त्यावर उसाचे पाचट किंवा वाळलेला गवताचा थर पसरून आच्छादन करावे.या अच्छादनावर मातीचा थर द्यावा. 6) हवाबंद केलेला मुरघास हा ४० ते ५० दिवस ठेवल्यास चाऱ्यामध्ये आंबवण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन उत्तम दर्जाचा मुरघास तयार होतो.
गाईंना मुरघास देण्याचे प्रमाण हे त्यांच्या दुध देण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. बाएफ - उरुळी कांचन
50
0