AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज प्रक्रिया झाली सुरू!
👉🏻राज्य शासनाच्या माध्यमातून वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना. योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये आता सुरू झाली असून, अर्ज मागवण्यात आले आहेत. 👉🏻मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये एक रकमी 3,000 रुपये मानधन अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात असलेल्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना वयमानानुसार येणाऱ्या विविध अपंगत्वांपासून होणारे त्रास कमी व्हावेत, म्हणून आवश्यक साधन खरेदी करण्यासाठी हे अनुदान दिले जाते. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कश्या पद्धतीने करावा याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ :Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
44
0
इतर लेख