AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सुरु!
👉🏻नुकत्याच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या व यामध्ये महिला वर्गाला दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने एक सगळ्यात मोठी घोषणा केली होती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची ही होय. ही योजना राज्यातील महिलांसाठी खूप दिलासा देणारी ठरणार असून या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. 👉🏻परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता व अटी ठेवण्यात आलेल्या होत्या व काही आवश्यक कागदपत्रांची देखील गरज होती. याकरिता राज्यभरात तहसील कार्यालयांमध्ये महिलांची मोठी गर्दी झाली व ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी शासनाला अधिक कुमक मागवावी लागली. परंतु आता तहसील कार्यालया बाहेर कागदपत्रांसाठी महिलांची होणाऱ्या गर्दीच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने काही कागदपत्रांच्या बाबतीत व काही अटींच्या बाबतीत शिथिलता आणली असून त्यामुळे महिला वर्गाला खूप मोठा दिलासा मिळणार आहे. 👉🏻संदर्भ :Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
0
इतर लेख