AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना!
योजना व अनुदानAgroStar
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना!
➡️महाराष्ट्रातील नारीशक्तीच्या पंखाला बळ देण्यासाठी राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. येत्या रक्षाबंधनाला या लाभाचा पहिला टप्पा बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. त्याचसोबत राज्य सरकारनं आता लाडक्या भावांसाठीही मोठी घोषणा केली आहे. ➡️ लाडका भाऊ योजना म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. ➡️कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे लाडका भाऊ योजना म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे. ➡️उमेदवाराची पात्रता: - किमान वय १८ व कमाल ३५ वर्षे असावे. - किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास, आयटीआय, पदवीका, पदवी, पदव्युत्तर असावी. - शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत. - उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. - त्याचे आधार नोंदणी असावे. - बँक खाते आधार संलग्न असावे. - कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. ➡️अर्ज कुठे भरावा: लाडका भाऊ योजना यासाठी इच्छूक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे. ➡️या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी फक्त ६ महिने असेल. या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल. या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास आणि उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. ➡️संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
42
1