गुरु ज्ञानAgroStar
मिरची: भुरी रोग समस्या आणि उपायोजना
👉🏻नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान मिरची पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. या रोगाचा प्रसार कोरडे, अंशतः ढगाळ वातावरण आणि कमी आद्रतेच्या परिस्थितीत झपाट्याने होतो. रोगग्रस्त झाडांच्या खालच्या जुन्या पानांवर भुरकट रंगाची पिठासारखी बुरशी तयार होते, ज्यामुळे पानांचा प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया प्रभावित होते. परिणामी, पाने आणि फुले पिवळी पडून गळू लागतात व झाड निस्तेज होते, ज्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो.
👉🏻भुरी रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पोटॅशयुक्त अन्नद्रव्य संतुलित प्रमाणात देणे उपयुक्त ठरते. यामुळे झाडाच्या रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होऊन पिक भुरी रोगास बळी पडत नाही. रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, ऍझोक्सिस्ट्रॉबीन 11% + टेबुकोनाझोल 18.3% एस सी घटक असलेले रोझताम बुरशीनाशक 1.25 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
👉🏻संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.