AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महिलांना लखपती होण्याची संधी!
योजना व अनुदान न्यूज १८ लोकमत
महिलांना लखपती होण्याची संधी!
➡️ भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या या योजनेबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. महिलांचं हित लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. 'एलआयसी आधार शिला योजना' असं या योजनेचं नाव आहे. ➡️ महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एलआयसीने विशेष योजना आणली आहे. ती म्हणजे 'एलआयसी आधार शिला योजना.' या योजनेअंतर्गत काढलेली पॉलिसी तुम्हाला लाखो रुपये मिळवून देऊ शकते. तुम्ही दररोज फक्त २९ रुपयांची बचत करून यात गुंतवणूक करायची. ➡️ पॉलिसीची मुदत संपल्यानंतर तुम्हाला तब्बल ४ लाख रुपये मिळू शकतात. एलआयसीची ही योजना महिलांचं हित लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. योजनेअंतर्गत ८ ते ५५ वर्षं वयोगटातल्या महिला गुंतवणूक करू शकतात. ➡️ एलआयसी आधार शिला योजनेअंतर्गत कमीतकमी ७५००० रुपये आणि जास्तीत जास्त ३ लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. या पॉलिसीचा मॅच्युरिटी कालावधी कमीत कमी १० वर्षं आणि जास्तीत जास्त २० वर्षं आहे. ➡️ या योजनेच्या मॅच्युरिटीवेळी पॉलिसीधारकाचं वय जास्तीत जास्त ७० वर्षं असू शकतं. या योजनेचा प्रीमियम भरणा मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर करता येईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ➡️ या योजनेच्या अधिक माहितीसाठी https://licindia.in/Products/Insurance-Plan/LICs_Aadhaar_Shila दिलेल्या लिंकवर क्लीक करा. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
6
इतर लेख