AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स – शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी!
हवामान अपडेटAgrostar
महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स – शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी!
👉गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत अवकाळी पावसाने थैमान घातले असून, वादळी वाऱ्यासह गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. कोकण, नाशिक, वर्धा, बुलढाणा, धुळे आणि मुंबई परिसरात या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला असून, नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे. 👉मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये ढगाळ हवामान असून, तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. कोकणात चक्राकार वाऱ्यांमुळे हापूस आंबा आणि कैऱ्यांचे उत्पादन धोक्यात आले आहे. सिंधुदुर्गमध्ये पावसामुळे आंबा आणि काजूच्या बागांचे नुकसान झाले आहे. 👉वर्धा जिल्ह्यात वादळी पावसामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, हजारो झाडे जमीनदोस्त झाली आहेत. धुळे आणि नाशिक जिल्ह्यात गारपिटीमुळे केळी, पपई, गहू, हरभरा, कांदा आणि द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. विजेच्या कडकडाटामुळे अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाला आहे. ⚠️ हवामानाच्या या बदलांचा विचार करून काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. आपण आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा योग्य तो सांभाळ करा! 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
0
इतर लेख