AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाराष्ट्रात पुन्हा हुडहुडी!
हवामान अपडेटAgrostar
महाराष्ट्रात पुन्हा हुडहुडी!
🥶उत्तर भारतात चक्रवातामुळे बुधवार ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान पाऊस,बर्फवृष्टीची शक्यता असल्याने बुधवारनंतर राज्यात पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी राज्यात सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान घसरल्याने वातावरणात गारवा होता. 🥶यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, या ठिकाणी किमान तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे थंडी जाणवत होती. 🥶उत्तर भारतात चक्रवातामुळे पुन्हा ८ ते १० फेब्रुवारीदरम्यान पावसाचा आणि बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे वातावरणावर त्याचा परिणाम होऊन उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये दाट धुके राहणार आहे. 🥶परंतु राज्यात किमान तापमानाची परिस्थिती स्थिर राहणार असून वातावरणात गारठा राहणार आहे. तर आकाश कोरडे व निरभ्र असल्याने दुपारी उन्हाची तीव्रताही जाणवेल. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 🥶संदर्भ:Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
26
4
इतर लेख