AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत!
हवामान अपडेटAgrostar
महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत!
➡️राज्यभरात पावसाने कहर केला आहे. राज्यातील विविध भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यतील काही नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडली आहे. कोकणभाग, पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस धुमशान मचावत आहे. यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये नागरिकांचे हाल झाले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुणे जिल्ह्यासह इतर काही जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ➡️ रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सध्या पावसाचा जोर वाढला असून नदी, नाले, दुथडी भरून वाहताना दिसत आहेत. ➡️सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. गेली 8 दिवस पावसाची बॅटिंग सुरू आहे. वारणा आणि कोयना पाणलोट परिसरात सतत पाऊस सुरू आहे. चांदोली आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पंचगंगा नदीने देखील धोक्याची पातळी गाठली आहे. पुराचे पाणी हे रस्त्यावर आलं आहे. याचा फटका हा आजूबाजूच्या गावांना बसला आहे. नदीचे पाणी हे मुख्य रस्त्यावर आल्याने वाहतुक ठप्प झाली आहे. ➡️दरम्यान राज्यात मुंबई येथे देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईच्या उपनगरांमध्येही पावसाने नको नको केलं आहे. पावसाने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. इस्टर्न आणि वेस्टर्न हायवे वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच मुंबई, ठाणे, कल्याण, पुण्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ➡️संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
0
इतर लेख