AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाराष्ट्रात पहिला सौर ऊर्जा प्रकल्प!
समाचारAgrostar
महाराष्ट्रात पहिला सौर ऊर्जा प्रकल्प!
➡️महाराष्ट्रातील पहिला 105 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प चंद्रपूर जिह्यातील ईराई धरणात उभा राहणार आहे. त्यासाठी महानिर्मिती आणि सतलज जल विद्युत निगममध्ये करार झाला आहे. पुढील पंधरा महिन्यांत या प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होणार असून त्याचा प्रतियुनिटचा दर केवळ 3 रुपये 93 पैसे असणार आहे. येथे तयार होणारी वीज पुढील 25 वर्षे महानिर्मितीला पुरवली जाणार आहे. ➡️कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना मोठया प्रमाणात प्रदूषण होते. तसेच दिवसोंदिवस कोळशाच्या किमती वाढत असल्याने विजेचे दरात वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने अपारंपरिक ऊर्जानिर्मितीची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असून चंद्रपूर जिह्यातील ईराई धरणात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी टेंडर मागवले होते. त्यानुसार 105 मेगावॅटचा सीर प्रकल्प उभारणे, चालवणे आणि वीजनिर्मिती करण्याचे टेंडर दिले आहे. हा प्रकल्प धरणातील पाण्याच्या पृष्ठभागावर 525 एकर जागेत असणार आहे. त्याच्या उभारणीसाठी सुमारे 730 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ➡️येणाऱ्या 15 महिन्यानंतर या प्रकल्पातून प्रत्यक्षात वीज निर्मितीला सुरुवात होणार असून या ठिकाणच्या तयार विजेचा प्रति युनिटचा दर 3 रुपये 93 पैसे असणार आहे व करारानुसार ही तयार वीज येणाऱ्या 25 वर्षांपर्यंत महानिर्मितीला पुरवली जाणार आहे. ➡️ संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
2
इतर लेख