AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाराष्ट्रात परतीचा पाऊस !
हवामान अपडेटAgrostar
महाराष्ट्रात परतीचा पाऊस !
💦राज्यात हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली आहे. यासह हवामान विभागाने सावधान राहण्याचा इशारा देखील दिला आहे. कालपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 5 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून माघारी फिरणार आहे. 💦 विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 💦परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण : विशेष म्हणजे 5 ते 10 ऑक्टोबर) दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दुसरीकडे वायव्य राजस्थान आणि गुजरातमधील कच्छमधून मान्सून आधीच माघारी परतला आहे. 💦जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणासह दिल्ली या ठिकाणाहूनही मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं आता पावसाची शक्यता कमी आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सूननिरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळं 10 ऑक्टोबर नंतर राज्यात पावसाची शक्यता कमी असण्याची शक्यता वर्तविली आहे. 💦संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
89
11