AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgroStar
मल्चिंग वापरताना ही चूक टाळा! 🌱
मल्चिंगचा वापर शेतीमध्ये वाढता आहे, पण त्याचा योग्य वापर कसा करावा हे माहित असणं गरजेचं आहे. काही वेळा आपण मल्चिंग अंथरल्यावर लगेचच होल पाडतो, ज्यामुळे जमिनीला होणारा फायदा कमी होतो. चला जाणून घेऊया योग्य पद्धत कशी आहे. 👉मल्चिंगचा पेपर अंथरल्यानंतर दोन दिवस थांबा ⏳ मल्चिंगचा पेपर जमिनीवर अंथरल्यानंतर लगेचच होल पाडू नका. किमान दोन दिवस थांबा. यामागचं कारण असं आहे की, पेपर अंथरल्यानंतर सूर्यप्रकाश थेट मल्चिंगवर पडतो आणि आतमध्ये वाफ तयार होते. 🔥 👉जमिनीत तयार होते नैसर्गिक उष्णता 🌞 मल्चिंगवर कोणतंही होल नसल्यामुळे, कुकरमध्ये जशी वाफ तयार होते, तशीच उष्णता जमिनीत तयार होते. यामुळे जमिनीत असलेल्या घातक बुरशीचा नाश होतो. मातीचे निर्जंतुकीकरण नैसर्गिक पद्धतीने होतं, जे रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशकांपेक्षा अधिक प्रभावी ठरतं. 🌍💧 👉ठिबक चालवा आणि उष्णता वाढवा 🚰 दोन दिवसांनंतर, १५-२० मिनिट ठिबक चालवा. यामुळे पाण्यामुळे जमिनीत हवा आणि उष्णता यांच्यात संघर्ष होतो, आणि पुन्हा मोठ्या प्रमाणात उष्णता तयार होते. यामुळे पूर्ण बेड निर्जंतुक होतो. 🌡️ 👉होल कधी पाडायचं? 🕓 चौथ्या दिवशी संध्याकाळी मल्चिंगला होल पाडा. होल पाडल्यावर १५-२० मिनिटं पाणी द्या, ज्यामुळे गरम हवा बाहेर पडेल. 🌬️ 👉रोपांची लागवड 🌱 होल पाडून झाल्यानंतर एक दिवस थांबा. उद्या संध्याकाळीच रोपांची लागवड करा. यामुळे माती नीट तयार होईल आणि तुमची शेती अधिक निरोगी आणि उत्पादनक्षम होईल.🌾 ही प्रक्रिया तुम्ही योग्यरित्या फॉलो केली, तर तुमच्या जमिनीत नैसर्गिक पद्धतीने निर्जंतुकीकरण होईल आणि उत्पादनात वाढ होईल. ✅ 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
0
इतर लेख