AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मध केंद्र योजनेंतर्गत मिळणार ५० टक्के अनुदान!
योजना व अनुदानAgrowon
मध केंद्र योजनेंतर्गत मिळणार ५० टक्के अनुदान!
➡️ महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मध केंद्र योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुतंवणूक यावर आधारित आहे. शासनाच्या हमी भावाने मध खरेदी विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती इत्यादींचा समावेश असणार आहे. ➡️ जिल्ह्यातील पात्र व्यक्ती किंवा संस्थांनी अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे. वैयक्तिक मधपाळ या घटकातील अर्जदार हा साक्षर असून, त्याचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. ➡️ याकरिता १०दिवसांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे केंद्र चालक प्रगतिशील मधपाळ या घटकासाठी वयोमर्यादा २१ वर्षे व किमान १० वी पास व सदर घटकाचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेती जमीन किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेतजमीन असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रूम नं. १६, तिसरा मजला, उद्योग भवन, आय.टी.आय. सिग्नल जवळ, सातपूर, नाशिक ७, दूरध्वनी क्र.०२५३–२३५२७३६ 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
53
9
इतर लेख