AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मका पिकातील पाणी देण्याच्या अवस्था!
गुरु ज्ञानAgrostar
मका पिकातील पाणी देण्याच्या अवस्था!
🌱पिकाच्या महत्त्वाच्या अवस्था पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील आहेत. मका पिकास पाणी देण्याच्या अवस्था पुढीलप्रमाणे आहेत. 1. रोपावस्था - पेरणीनंतर सुरुवातीचे 25 ते 30 दिवस बियाण्याची उगवण होऊन रोपाची वाढ होण्यासाठी जमिनीत या अवस्थेत वाफसा असणे गरजेचे आहे. 2. वृद्धिकाळ - उगवणीनंतर 35 ते 40 दिवसांचा या अवस्थेमध्ये झाडाच्या खालून पाचव्या पेऱ्यापर्यंत दुय्यम मुळे निघतात व ती जमिनीत रुजतात. त्यामुळे झाडाला बळकटी येते. या अवस्थेत झाडाची जोमदार वाढ होऊन पानांची पूर्णपणे निर्मिती होते. 3. फुलोरा अवस्था - उगवणीपासून 45 ते 60 दिवसापर्यतचा हा काळ आहे. तूरा वरच्या टोकापासून झुपक्यासारखा येतो. यामधून पुंकेसर बाहेर पडण्याची क्रिया या १५ दिवसापर्यत सुरू राहते. 4. कणसे लागण्याचा कालावधी - तुरा बाहेर पडल्यानंतर 2-3 दिवसात प्रथम कणीस बाहेर पडण्यास सुरूवात होते. या कणसातून स्त्रीकेसरबाहेर पडतात व या स्त्रीकेसरावर तु-यामधून निघणारे पुंकेसर पडून त्यांचे संयोगीकरण होते व बीजधारणा होते. कणीस निघण्याचा व संयोगीकरणाचा कालावधी साधारणपणे 50 ते 70 दिवस पर्यतचा असतो. बीजधारणा झाल्यावर कणसात दाणे भरण्यास सुरूवात होते. 5. दुधाळ अवस्था - दाणे भरताना प्रथमत: दाणे पक्क न होता हुरडा होण्याचा काळ. हा काळ साधारणत 4 ते 5 आठवड्याचा असतो. या काळात झाडाच्या शुष्क भागात सक्रियवाढ (85% पर्यत) होते. 6. दाणे पक्व होण्याचा काळ - दुधाळ अवस्थेनंतर दाणे पक्क होण्याकरीता 15ते 20 दिवस लागतात. दाणे पक्क होण्याची चिन्हे म्हणजे दाण्याच्या खालच्या भागाला काळा थर तयार होतो. दाणे पक्क झाल्यानंतर कणसे पिवळी होताच कापणी करू शकतो. 🌱वरील माहितीच्या आधारे मका गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी पिकामध्ये काळजीपूर्वक पाणी व्यवस्थापन करावे. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
3