गुरु ज्ञानAgrostar
मका पिकातील अळी नियंत्रण
👉सध्याच्या काळात मका पिकात लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे, ज्यामुळे उत्पादनात मोठी घट होत आहे. लष्करी अळी सुरुवातीच्या अवस्थेत कोवळ्या पानांवर उपजीविका करते आणि नंतर पोंग्यात छिद्र पाडून आतील भाग खाते. त्यामुळे पिकाचे 30 ते 60 टक्के नुकसान होऊ शकते.
👉लष्करी अळीचे प्रभावी नियंत्रण
प्रथम प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मका लागवडीच्या 15 दिवसांच्या आत नर पतंग पकडण्यासाठी फेरोमेन सापळे एकरी 4 ते 6 बसवावेत.
👉प्रादुर्भाव झाल्यास अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट घटक असणारे अमेज - एक्स @100 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.
👉एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी फेरोमेन सापळे, शत्रुपक्षी आणि योग्य प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करावा.
👉मका पिकाचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक व नियंत्रक उपाय अवलंबा आणि उत्पादन वाढवा.
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.