गुरु ज्ञानAgrostar
भेंडीच्या फळाची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय
👉भेंडी पिकात अळी किंवा थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव तसेच संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन नसल्यानं फळ वाकडे होणे आणि फळे तोडण्यासाठी कठीण होणे ह्या समस्या उद्भवू शकतात. यावर प्रभावी उपाय म्हणून, सुरुवातीपासूनच थ्रिप्स आणि अळींचे नियंत्रण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच बरोबर, पिकाला आवश्यक पोषण तत्त्वे योग्य प्रमाणात देणे महत्वाचे आहे.
👉फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि फळे तोडण्यास सोपी होण्यासाठी, कॅल्शियम 11% आणि ग्लुकोनोलॅक्टेट घटक असणारे Nanovita CA11 @1.5 मिली प्रति लिटर सोबत बोरॉन इथेनॉलमाइन 10% घटक असणारे Nanovita B10 @1.5 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावी. या फवारणीमुळे फळांची मजबूती वाढेल, फळांची गुणवत्ता सुधारेल आणि तोडणीच्या कामामध्ये सुलभता येईल.
👉संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन, योग्य कीटकनाशक आणि सूक्ष्म अन्नतत्त्वांची वापर यामुळे भेंडी पिकात फळांच्या गुणवत्तेत सुधारणा होईल, तसेच उत्पादनामध्ये वाढ होईल.
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.