AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडी पिकातील भरघोस उत्पादनासाठी लागवडीचे नियोजन
गुरु ज्ञानAgroStar
भेंडी पिकातील भरघोस उत्पादनासाठी लागवडीचे नियोजन
👉भेंडीच्या पिकामध्ये योग्य अंतर ठेवून लागवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण अयोग्य अंतर ठेवल्यास पिकाला आवश्यक अन्नद्रव्ये, हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश यांचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. यामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो आणि कीड व रोगांचे व्यवस्थापन करणे कठीण होऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता वाढते. 👉भेंडीच्या योग्य उत्पादनासाठी लागवड सरी-वरंब्यावर करावी. दोन ओळींमधील अंतर साधारणपणे 1.5 फूट आणि दोन झाडांमधील अंतर 1 फूट ठेवावे. हे अंतर ठेवल्याने भेंडीच्या झाडांची जोमदार वाढ होण्यास मदत होते. तसेच, झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा मिळते, ज्यामुळे पिकातील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. 👉यासोबतच, योग्य अंतरामुळे पाणी आणि अन्नद्रव्यांचा प्रभावी वापर होतो, ज्यामुळे उत्पादन वाढते आणि फळांची गुणवत्ता सुधारते. लागवडीसाठी योग्य अंतर राखल्याने शेतकऱ्यांना भेंडीच्या पिकात अधिक उत्पादन मिळवणे शक्य होते, त्यामुळे उत्पन्नात चांगली भर पडू शकते. 👉स्रोत:- AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
0