AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भुईमूग पिकातील कीड व रोग व्यवस्थापन
गुरु ज्ञानAgrostar
भुईमूग पिकातील कीड व रोग व्यवस्थापन
भुईमूग पिकाच्या सुरुवातीच्या काळात रसशोषक कीड, पाने खाणारी अळी, आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. या प्रादुर्भावामुळे पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो आणि उत्पादनात घट होते. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य कीड आणि रोग व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. 👉पिकाचे संरक्षण करण्यासाठी पुढील पद्धतीने उपाययोजना कराव्यात: 1.कीटकनाशक वापर: रसशोषक कीड व पाने खाणारी अळी यांचे नियंत्रण करण्यासाठी थायोमिथॉक्साम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असणारे किल एक्स कीटकनाशक 0.8 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 2. बुरशीनाशक वापर: बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम + मॅंकोझेब घटक असणारे मँडोझ बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 👉फवारणी करताना शिफारस केलेल्या प्रमाणाचे काटेकोरपणे पालन करावे. फवारणीसाठी सकाळी किंवा संध्याकाळी वेळ निवडावी. अशा उपाययोजनांमुळे भुईमूग पिकाचे नुकसान टाळून आरोग्यपूर्ण वाढ होईल आणि चांगल्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल. 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0