AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भारतीय पोस्टमध्ये 10वी पाससाठी मोठी संधी!
नोकरीAgroStar
भारतीय पोस्टमध्ये 10वी पाससाठी मोठी संधी!
👉🏻 भारतीय पोस्टने स्टाफ कार ड्रायव्हरच्या पदांसाठी मोठ्या प्रमाणात रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. भारतीय पोस्टच्या या भरती अंतर्गत, स्टाफ कार ड्रायव्हरच्या पदांवर उमेदवारांची निवड होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जुलै आहे. जर तुम्ही या नोकरीसाठी पात्र असाल तर वेळ न दवडता लगेच अर्ज करा. 👉🏻शैक्षणिक पात्रता: - मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. - तसेच, मोटार यंत्रणेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. - उमेदवारांना शक्यतो होमगार्ड किंवा नागरी स्वयंसेवक म्हणून किमान 3 वर्षांचा अनुभव आणि मोटार कार चालविण्याचा अनुभव असावा. 👉🏻अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर्षांच्या आत असावे. 👉🏻आवश्यक कागदपत्र: - आधार कार्ड - पॅन कार्ड - अधिवास प्रमाणपत्र - जात प्रमाणपत्र - उत्पन्नाचे प्रमाणपत्र - 10वी किंवा 12वीची मार्कशीट 👉🏻वेतन : निवडलेल्या उमेदवारांना लेव्हल-2 अंतर्गत 19,900 ते 63,200 रुपये वेतन दिले जाईल. याशिवाय, सरकारी नोकरीच्या अन्य सुविधाही मिळतील. 👉🏻अर्ज प्रक्रिया: 1. अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जा. 2. स्टाफ कार ड्रायव्हरच्या पदासाठी जाहीर केलेल्या नोटिफिकेशनला क्लिक करा. 3. आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा. 4. आवश्यक कागदपत्रांची प्रत अपलोड करा. 👉🏻भारतीय पोस्टमध्ये स्टाफ कार ड्रायव्हरच्या पदांसाठी ही सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि तुमच्याकडे तीन वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव असेल, तर तुमच्यासाठी ही नोकरी उत्तम आहे. सरकारी नोकरीचे फायदे आणि आकर्षक पगार मिळवण्यासाठी त्वरित अर्ज करा आणि तुमचे स्वप्न साकार करा. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
47
3