AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भात रोपवाटिका व्यवस्थापनासंदर्भात संपूर्ण माहिती!
गुरु ज्ञानAgroStar
भात रोपवाटिका व्यवस्थापनासंदर्भात संपूर्ण माहिती!
🌱अन्नधान्ये पिकांमध्ये भात हे एक प्रमुख तृणधान्ये पीक असून खरिफ हंगामात सगळ्यात जास्त लागवड केली जाते. भात पिकामध्ये अधिक उत्पादन मिळण्यासाठी पिकाच्या इतर व्यवस्थापना बरोबरच रोपवाटिका व्यवस्थापन देखील महत्वाचे आहे. सुरुवातीला वाणांचा कालावधी बघून दर्जेदार वाणांची निवड करून रोपवाटिका तयार करावी. पाण्याच्या उपलब्धतेनुसार रोपवाटिका 15 मे ते 15 जून पर्यंत करणे आवश्यक आहे. रोपवाटिका तयार करत असताना पुढील प्रमाणे नियोजन करावे. - एक एकर क्षेत्रासाठी किमान 4 गुंठ्यांवर रोपवाटिका तयार करावी. रोपवाटिकेसाठी सुपीक व पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. - चांगली खोलवर जमिनीची उभी आडवी नांगरट करून कचरा व धसकटे वेचून शेत स्वच्छ करावे. त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत मिक्स करून घ्यावे. - जमिनीची मशागत झाल्यानंतर 1-1.20 मीटर रुंद व 10-15 सेंमी उंच आणि आवश्यकतते नुसार लांबीचे गादीवाफे तयार करावेत. - एका गादी वाफ्यामध्ये 2 किलो निंबोळी पेंड, युरिया 150 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट 250 ग्रॅम, राख 250 ग्रॅम व्यवस्थित मिश्र करून द्यावे. - खोडकिडीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी फिप्रोनिल 0.3% जीआर घटक असणारे ॲग्रोनिल जीआर 1 किलो 4 गुंठे क्षेत्रासाठी वापरावे. - संकरित जातीसाठी एकरी 7 ते 8 किलो बियाणे वापरावे. - स्वतः तयार केलेले बियाणे वापरत असल्यास त्याला बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यातील वजनदार व निरोगी बियाणे निवडण्यासाठी 3% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी 300 ग्रॅम मीठ 10 लिटर पाण्यात विरघळवून द्रावण तयार करावे. पेरणीपूर्वी बियाणे या द्रावणात ओतावे. नंतर द्रावण ढवळून स्थिर होऊ द्यावे. तरंगणारे हलके, किडकट, रोगट इत्यादी बियाणे काढून टाकावे. तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे आणि सावलीत वाळवावे. - त्यानंतर बुरशीनाशकाची प्रक्रिया करून त्या बियाणांचा उपयोग रोपे निर्मितीसाठी करावा. - बियाण्याची पेरणी ओळीत व विरळ करावी. पुढे वाफ्यात बी पेरल्यापासून ते उगवेपर्यंत जमिनीत पुरेशी ओल ठेवावी. - रोप वाढीच्या काळात रसशोषक किडी तसेच विविध बुरशीजन्य रोगांचे प्रतिबंधात्मक नियंत्रण करण्यासाठी थायामेथोक्सम 25% WG घटक असणारे क्रुझर कीटकनाशक आणि हेक्साकोनाझोल 5% SC घटक असणारे हेक्सझा बुरशीनाशक यांची एकत्रित फवारणी करावी. - - - रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी प्रति गुंठा 1 किलो युरिया खत द्यावे. - 21 ते 27 दिवसांच्या वयाची निरोगी रोपे लागवडीसाठी निवडावी व लागवडीपूर्वी रोपे अरेक्स 505 आणि मँडोझ च्या द्रावणात 2 तास बुडवून ठेवावी. जेणेकरून सुरुवातीच्या काळात कीड व रोगांपासून पिकाचे संरक्षण होईल. - लागवडीनंतर देखील संतुलित खतांचे, पाण्याचे आणि तण व्यवस्थापन करावे तसेच करपा, पानांवरील ठिपके, हिरवे तुडतुडे, खोडकीड, लष्करी अळी यांसारखे कीड व रोग वेळेवर नियंत्रित ठेवावे. जेणेकरून पिकामध्ये गुवणवत्तापूर्ण आणि अधिक उत्पादन मिळण्यासाठी मदत होईल. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
0
इतर लेख