AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भात पड क्षेत्रासाठी ‘या’ जिल्हयांना ७ कोटी अनुदान
कृषि वार्तापुढारी
भात पड क्षेत्रासाठी ‘या’ जिल्हयांना ७ कोटी अनुदान
पुणे – राज्यात सततच्या पावसामुळे द्राक्षबागांसह डाळिंब, केळी, कांदा, मका, सोयाबीन पिकाला मोठया प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट अपेक्षित असतानाच, फळांसह सर्व शेतमालाच्या निर्यातीमधील महाराष्ट्राचा टक्का निश्चितच घटण्याचा अंदाज कृषी विभागातून वर्तविण्यात आला.
देशातून मागीलवर्षी दोन कोटी ८४ हजार ६९० मेट्रिक टनाइतकी कृषी व कृषी उदयोगावर आधारित शेतमालाची निर्यात झालेली आहे. त्यामध्ये फळे, भाजीपाला, भेंडी, हिरवी मिरची, दुधी भोपळा, कृषी प्रक्रिया माल, पोल्ट्री मीठ, फुले व अन्य मालांचा समावेश आहे. द्राक्ष बागांना सर्वाधिक फटका बसल्याचे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले. या शेतमालाच्या निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. मात्र, परतीच्या पावसामुळे यंदाच्या २०१९-२० या आर्थिक वर्षातील राज्याचा निर्यातीमधील टक्का घटण्याची दाट शक्यता कृषी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली. संदर्भ – पुढारी, ९ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
14
0
इतर लेख