AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भाजीपाला निर्यात करायचा असेल तर लागणार  हे  कागदपत्र !
कृषी वार्ताAgrostar
भाजीपाला निर्यात करायचा असेल तर लागणार हे कागदपत्र !
👉🏻शेतकऱ्याचा कल भाजीपाला व्यवसायाकडे :- अगदी कमी दिवसामध्ये शेतात भाजीपाला पिकवून शेतकरी जवळच्या असणाऱ्या मार्केट ला पाठवतो आणि त्यामधून पैसे कमवत आहे. कारण पारंपरिक पिकापेक्षा शेतकऱ्याला भाजीपाला पिकामधून जास्त पैसे भेटतात त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी आता आपल्या शेतात भाजीपाला पिकवू लागलेत आणि दुसरीकडे निर्यात करू लागले आहेत. मात्र आता आता तुम्हाला जर भाजीपाला निर्यात व्यवसायामध्ये पडायचे असेल तर आता शेतमाल आयात निर्यात परवाना काढावा लागणार आहे. जे की हा परवाना काढण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे. 👉🏻आयात निर्यात परवाना काढण्यासाठी लागणारी कागडपत्रे :- १. संस्था नोंदणी प्रमाणपत्र तसेच आयकर विभागाकडून मिळणारा खाते क्रमांक व त्याची प्रत. तसेच बँकेच्या लेटरवर प्रमाणपत्र. २. दोन पासपोर्ट साईझ फोटो तसेच बँकेच्या प्रपत्रावरील पासपोर्ट साईझ फोटो वर अधिकाऱ्याची सही. ३. सहसंचालक विदेश व्यापार यांच्या नावे इंग्रजी मध्ये लिहलेल्या १ हजार रुपयांचा पुणे किंवा मुंबई येथील राष्ट्रीयकृत बँकेमध्ये देय असणारा डिमांड ड्राफट तसेच प्रपत्रानुसार घोषणपत्र आवश्यक असणे गरजेचे आहे. ४. A4 आकार साईझचे पाकीट व तीस रुपयांचा पोस्टल स्टॅम्प. ५. अर्ज सोबत माहिती व त्याचे नमुने http://dgft.delhi.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. प्रपत्रातील तपशीलवर सर्व माहिती भरून अर्जदाराने सहसंचालक विदेशी व्यापाऱ्यांच्या पुणे व मुंबई मधील कार्यालयात जाऊन स्वतः किंवा टपाल सेवेने सर्व कागदपतत्रासोबत अर्ज करणे गरजेचे आहे. ६. आयात निर्यात परवाना तुम्हाला मिळाला की त्या नंतर निर्यात वृद्धी परिषदेकडील नोंदणी प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे आहे. मात्र यासाठी कृषीमाल व प्रक्रिया पदार्थ निर्यायीसाठी अपेडा नवी दिल्ली यांच्या कार्यलयात किंवा अपेड च्या वेबसाईट वर नोंदणी करता येते. 👉🏻शेतमाल सुरक्षतेबाबत हमी देण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :- १. ग्लोबल गॅप सर्टिफिकेट २. आरोग्यविषयक प्रमाणपत्र ३. ऍगमार्क प्रमाणपत्र ४. सॅनिटरी प्रमाणपत्र. याप्रकरची सर्व प्रमाणपत्रे तुम्हाला काढावी लागणार आहेत. 👉🏻संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. "
14
6
इतर लेख