AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भरोसा किटने होणार कापसाचे उत्पादन सुपर हिट!
गुरु ज्ञानAgroStar
भरोसा किटने होणार कापसाचे उत्पादन सुपर हिट!
🌱शेतकरी मित्रांनो ॲग्रोस्टार घेऊन आले तुमच्यासाठी कापूस पिकातील संपूर्ण भरोसा किट!!! आपल्या महाराष्ट्र राज्यात विदर्भ आणि मराठवाडा विभागात कापूस हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या रसशोषक किडींच्या व जमिनीतून येणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी व सोबतच पिकाच्या जोमदार वाढीसाठी चांगले काम करणारे भरोसा किट. 🌱संपूर्ण भरोसा किटमधील उत्पादके - या किटमध्ये आपल्याला शटर नावाचे कीटकनाशक 100 ग्रॅम, मँडोझ नावाचे बुरशीनाशक 500 ग्रॅम आणि ह्युमिक पॉवर एनएक्स 400 ग्रॅम हे आपल्याला प्रति एकर याप्रमाणे वापरायचे आहे. 🌱 भरोसा किट वापरण्याचा फायदा - शटर कीटकनाशक आंतरप्रवाही असल्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेत येणाऱ्या रसशोषक किडींचे तसेच जमिनीतून येणाऱ्या किडींचे प्रतिबंधात्मक नियंत्रण करते. मँडोझ बुरशीनाशक सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी काम करते. तसेच ह्युमिक पॉवर एनएक्स पांढऱ्या मुळांची संख्या वाढवते. यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा अपटेक चांगला होतो. सोबतच पिकाची जोमदार वाढ होऊन फूटव्यांची संख्या वाढते आणि एकंदरीत उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. 🌱पिकाची अवस्था - कापूस पीक उगवून आल्यानंतर साधारणतः 7 दिवसांपासून ते 15 दिवसांपर्यंत आपण संपूर्ण भरोसा किटचा वापर करावा. 🌱वापरण्याची पद्धती - वरील सर्व औषधे आपल्याला 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्या कापूस पिकाला आळवणी पद्धतीने वापरायची आहेत. यामध्ये पंपाचा पुढचा नोझल काढून गोल बांगडी पद्धतीने रिंग करून प्रति झाड 30 ते 50 मिली दयायचे आहे. आळवणी करताना जमिनीमध्ये पुरेशी वाफसा असावी आणि औषधी रोपाच्या पानांवर व खोडावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0
इतर लेख