AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना!
योजना व अनुदानAgrostar
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना!
➡️बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आपल्या देशातील मुलींचे जीवनमान सुधारण्यासाठी व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय द्वारे सुरू करण्यात आली आहे. मुलीच्या पालकांनी कोणत्याही राष्ट्रीय बँकेत किंवा जवळच्या टपाल कार्यालयात मुलीचे बँक खाते उघडले पाहिजे. मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या १० वर्षापर्यंत या योजनेअंतर्गत बँक खाते उघडले जाऊ शकते. त्याअंतर्गत मुलीचे बँक खाते उघडल्यापासून ते ती मुलगी १४ वर्ष्याची होईपर्यंत तिच्या पालकांना तिच्या बँक खात्यात निश्चित अशी रक्कम जमा करावी लागेल. यानंतर मुलीचे वय १८ वर्षानंतर या जमा रकमेपैकी ५०% रक्कम पालक तिच्या शिक्षण खर्चासाठी काढू शकतात. मुलगी २१ वर्षाची झाल्यानंतर मुलीच्या लग्नासाठी संपूर्ण रक्कम काढली जाऊ शकते. अशी हि केंद्र सरकारची बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे. ➡️बीबीबीपी योजना च्या अंतर्गत जर तुम्ही दरमहा १,०००/- रुपये म्हणजेच दर वर्षी १२,०००/- रुपये जमा केले, तर तुमचे १४ वर्षात १ ,६८,०००/- रुपये जमा केले जातील. २१ वर्षानंतर बँक खात्याची मुदत संपल्यानंतर मुलीला रुपये ६,०७,१२८/- हि रक्कम दिली जाईल. मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर देखील या देय रकमेतून ५० टक्के रक्कम काढली जाऊ शकते. उर्वरित ५० टक्के रक्कम मुलीच्या लग्नाच्या वेळी म्हणजेच २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर काढता येईल ➡️बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची कागदपत्रे – >>आधार कार्ड >>मुलगी जन्म प्रमाणपत्र >>पासपोर्ट आकाराचा फोटो >>पालकांची ओळखपत्र >>पत्ता पुरावा >>मोबाइल नंबर ➡️बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या अधिक माहितीसाठी समोरील लिंक वर क्लिक करा. https://wcd.nic.in/schemes-listing/2405 ➡️बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा. https://wcd.nic.in/bbbp-schemes ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
10
इतर लेख