AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बीजोत्पादन कांद्याची काढणी प्रक्रिया!
गुरु ज्ञानAgrostar
बीजोत्पादन कांद्याची काढणी प्रक्रिया!
👉🏼लागवड झाल्यानंतर साधारणतः 3 महिन्यांमध्ये बीजोत्पादनाच्या कांद्याची काढणी केली जाते. 👉🏼बियांचे गोंडे किंवा फुले काढणीला आल्यावर त्यांचा रंग तपकिरी होतो आणि बियांचे वरचे आवरण फाटून त्यात काळपट बी दिसू लागते. 👉🏼एकाच वेळी सर्व फुले काढणे शक्य होत नाही. त्यासाठीजशी फुले काढणीला येतील तशी खुडून घ्यावीत. 👉🏼फुले काढणी नंतर 5 ते 6 दिवस उन्हामध्ये चांगली सुकवून घ्यावीत. 👉🏼चांगल्या सुकलेल्या गोंड्यातून बी काठीने हळूहळू मारून वेगळे करावे. 👉🏼त्यानंतर उफणनी करून बी स्वच्छ करून घ्यावे आणि योग्य रीतीने त्याची साठवणूक करावी. 👉🏼संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
2
इतर लेख