गुरु ज्ञानAgrostar
बाजरी पिकातील विरळणी आणि आंतरमशागत
बाजरी पिकामध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी रोपांची योग्य संख्या राखणे गरजेचे आहे. यासाठी विरळणी आवश्यक असते.
👉विरळणीचे महत्त्व व वेळ
✔ पहिली विरळणी पेरणीनंतर 10 दिवसांनी करावी.
✔ गरजेनुसार दुसरी विरळणी 20 ते 25 दिवसांनी करावी.
✔ यामुळे निरोगी रोपे राहतील व वाढ चांगली होईल.
👉तण नियंत्रणासाठी उपाय
✔ बाजरीच्या सुरुवातीच्या वाढीमध्ये तण नियंत्रण करणे खूप महत्त्वाचे आहे.
✔ सुरुवातीच्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत 1 खुरपणी आणि 1 कोळपणी करावी.
✔ तणामुळे पिकाला सूर्यप्रकाश, पाणी आणि अन्नद्रव्यांची कमी भासू शकते.
👉पीक पोषणासाठी उपाय
✔ खुरपणीनंतर रासायनिक खतासोबत ॲग्रोस्टार भूमिका या पीकपोषकाचा वापर करावा.
✔ यामुळे सफेद मुळीची वाढ चांगली होईल व पिकाला पोषक घटक चांगल्या प्रकारे मिळतील.
✔ परिणामी, पिकाची वाढ जोमदार होऊन उत्पादनात वाढ होईल.
योग्य व्यवस्थापन केल्यास बाजरीचे उत्पादन वाढून अधिक फायदा मिळू शकतो! ✅🌾
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.