AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटा बेणे प्रक्रिया
गुरु ज्ञानAgroStar
बटाटा बेणे प्रक्रिया
👉बटाटा लागवडीचे नियोजन करताना शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या अवस्थेत रसशोषक कीड, जमिनीतील कीड आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो, ज्यामुळे पिकाच्या सुरुवातीच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. यासाठी योग्य वेळी पिकाची निगराणी आणि बेणेप्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. 👉बटाट्याचे बियाणे लागवडीपूर्वी बुरशीजन्य रोग व किडींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी बेणेप्रक्रियेला विशेष महत्त्व असते. मेटालॅकझील 8% + मॅंकोझेब 64% WP घटक असणारे मेटल ग्रो बुरशीनाशक @3 ग्रॅम, थायमेथॉक्साम 75% एसजी घटक असणारे शटर कीटकनाशक @1 ग्रॅम व 13:00:45 @10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून बियाण्यांची प्रक्रिया करावी. ही एकत्रित प्रक्रिया केल्याने बियाणे रोगमुक्त राहते व उगवण चांगली होते. 👉बेणेप्रक्रियेचे फायदे म्हणजे पिकाची सुरुवात चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते. सुरुवातीच्या अवस्थेत कीड व रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते. योग्य नियोजन आणि योग्य प्रक्रिया करून बटाटा उत्पादनात वाढ साधता येऊ शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
0
इतर लेख