AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बँक खात्यात वार्षिक 11000 रु. मिळवा!
कृषि वार्ताAgrostar
बँक खात्यात वार्षिक 11000 रु. मिळवा!
👉 शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ""पी एम किसान खाद योजना "" राबवली जात आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्याला दोन हप्त्यांमध्ये वार्षिक 11,000 रुपये खत अनुदान दिले जाते. मोदी सरकारचे हे पाऊल शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगली खते, बियाणे आणि कीटकनाशके खरेदी करता येतात. 👉पी एम किसान खाद योजनेचे फायदे: ◆ पी एम किसान खाद योजनेअंतर्गत, खते खरेदी करण्यासाठी देशभरातील सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी 11,000 रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना या अनुदानाची रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाते. ◆ खरीप पिकाची लागवड करण्यापूर्वी पहिला हप्ता (6000 रुपये) शेतकऱ्याला दिला जातो. त्याच वेळी, दुसरा हप्ता (रु. 5000) रब्बी पिकाच्या सुरुवातीला दिला जातो. ◆ भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी खत कंपन्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे पाठवतात. ◆ या योजनेसाठी dbtbharat.gov.in किंवा https://fert.nic.in/dbt वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता 👉🏼संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
65
23
इतर लेख