योजना व अनुदानAgroStar
फवारणी पंपासाठी 100% अनुदान मिळणार!
👉🏻महाराष्ट्रातील तेलबिया पिकांच्या लागवडीला चालना मिळावी, शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळावे, तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देणे यासाठी एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवली जात आहे.यायोजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप अनुदानावर उपलब्ध करून दिला जात आहे. विशेष म्हणजे हा फवारणी पंप 100% अनुदानावर शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे.
👉🏻दरम्यान आता आपण या योजनेअंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अनुदान अर्ज कसा करायचा? या संदर्भात माहिती जाणून घ्या.
👉🏻अर्ज कसा करावा लागणार ?
- फवारणी पंपासाठी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. येथे गेल्यानंतर शेतकऱ्यांना लॉगिन घ्यावे लागणार आहे.
- ज्या शेतकऱ्यांकडे आधीच युजर आयडी आणि पासवर्ड असेल त्यांनी युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन घ्यायचे आहे. ज्यांच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड नसेल त्यांनी तो तयार करायचा आहे आणि मग लॉगिन करायचे आहे.
- लॉग इन केल्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून कृषी यांत्रिकीकरण या बाबीवर जायचे आहे. मग मुख्य घटक बाबीवर क्लिक करायचे आहे. एवढे झाले की, तपशीलवर क्लिक करून मनुष्यचलित औजारे घटक निवडायचा आहे.
- मग यंत्र/औजारे व उपकरणेमध्ये पिक संरक्षण औजारेमध्ये जाऊन बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन) ही बाब निवडायची आहे. मग अर्ज जतन करायचा आहे.
- अशा तऱ्हेने तुम्ही बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप यासाठी अर्ज करू शकणार आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की यासाठी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यासाठी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करायचा आहे.
👉🏻संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.