AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फळानां तडे जाणे समस्यांवर उपाययोजना
कृषि वार्ताAgroStar
फळानां तडे जाणे समस्यांवर उपाययोजना
👉उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत फळझाडे आणि फळभाजीपाला पिकांमध्ये फळे लागल्यानंतर अनेक वेळा तडे जाण्याची समस्या दिसून येते. ही समस्या मुख्यतः पाण्याच्या ताणामुळे, अचानक जास्त पाणी दिल्यामुळे, बोरॉन व कॅल्शिअमसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे तसेच फळधारणेदरम्यान थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव झाल्यास वाढते. 👉फळांना तडे जाण्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होते आणि फळांची गुणवत्ता व बाजारभाव देखील कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळी उपायोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. 👉उपाययोजना: - सर्वप्रथम पाण्याचे अचूक नियोजन करावे. पिकाला ताण जाणार नाही याची खबरदारी घ्या. - ठिबक सिंचनाद्वारे दर आठवड्याला दोनदा कॅल्शिअम नायट्रेट @ 5 किलो/एकर प्रमाणे द्यावे. - यासोबतच बोरॉन एकदा @ 1 किलो/एकर वेगळ्या वेळेस द्यावे. 👉ही अन्नद्रव्ये झाडांना योग्य पोषण देतात आणि फळांची गुणवत्ता टिकवून ठेवतात. यामुळे फळांमध्ये तडे जाण्याचे प्रमाण कमी होते आणि उत्पादनही अधिक मिळते. 👉आपल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी या उपाययोजना अंमलात आणा आणि उन्हाळ्यातही मिळवा दर्जेदार उत्पादन! 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
2
0
इतर लेख