AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फळगळ थांबवा – कारणे आणि उपाय!
गुरु ज्ञानAgrostar
फळगळ थांबवा – कारणे आणि उपाय!
फळपिकांमध्ये विविध कारणांमुळे फळगळ होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. 1. जमिनीत हवा खेळती न राहणे: भारी काळ्या जमिनीत सतत ओलावा राहिल्याने झाडाच्या मुळांद्वारे अन्नद्रव्यांची वाहतूक मंदावते. परिणामी, पाने पिवळी पडणे, पानगळ, फुलगळ, आणि फळगळ होतात. 2. ढगाळ हवामान: अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे अन्नद्रव्य निर्मिती कमी होते, ज्यामुळे फळगळ होते. 3. पानविरहित फांद्या: फळांची योग्य वाढ होण्यासाठी झाडावर पुरेशी पालवी असणे आवश्यक आहे. पानविरहित फांद्यांवर पोसलेली फळे कमकुवत राहतात. 4. तापमानातील तफावत: जास्त तापमान किंवा दिवस-रात्रीच्या तापमानातील फरकामुळे फळगळ होते. 5. असंतुलित अन्नद्रव्य आणि पाणी पुरवठा: संतुलित अन्नद्रव्यांचे नियोजन आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. 6. फळमाशीचा प्रादुर्भाव: फळमाशीमुळे फळांचे नुकसान होते. यावर प्रतिबंधासाठी सापळे लावणे, प्लास्टिक बॅग वापरणे, आणि कीटकनाशकांची फवारणी करावी. 7. बुरशीचा प्रादुर्भाव: फळ देठाजवळ बुरशीमुळे फळकमकुवत होऊन गळते. फळगळ टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन, संतुलित अन्नद्रव्ये, आणि कीटकनाशकांचा वापर करणे गरजेचे आहे. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
0
इतर लेख