AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फक्त 330 रुपये खर्च करून मिळवा 2 लाख रुपये!
योजना व अनुदान न्यूज १८ लोकमत
फक्त 330 रुपये खर्च करून मिळवा 2 लाख रुपये!
➡️ आपल्या कुटुंबाची भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक झाले आहे.यासाठी विमा योजना केंद्र सरकार राबवत आहे. विमा योजनाकेंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेऊ शकता. ➡️ या योजनेंतर्गत, लाभार्थीचा कोणत्याही प्रकारे मृत्यू झाल्यास, नॉमिनी किंवा कुटुंबाला २ लाख रुपयांची रक्कम मिळते. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर विमाधारक व्यक्तीच्या नॉमिनीला किंवा कुटुंबाला २ लाख रुपयांचा विमा मिळेल. ३३० रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागेल ➡️ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी, दरवर्षी ३३० रुपये प्रीमियम भरावा लागतो. बँक खाते असणे आवश्यक आहे. ➡️ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे. हे बँक खाते सरकारी किंवा खाजगी बँकेत असू शकते. यानंतर अर्जदाराला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागेल. याचा फायदा कोठून घेता येईल? ➡️ ही योजना LIC तसेच इतर खाजगी जीवन विमा कंपन्यांमार्फत चालवली जाते. तुम्हा तुमच्या बँकेला भेट देऊनही माहिती मिळू शकते, अनेक बँकांचे विमा कंपन्यांशी टाय-अप आहेत. अधिक माहितीसाठी - https://www.jansuraksha.gov.in/ क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
5