AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पोस्टात तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी!
नोकरीकृषि जागरण
पोस्टात तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी!
➡️सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. इंडिया पोस्टमध्ये भरती निघाली असून महाराष्ट्र सर्कलसाठी त्यांना 257 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यावर अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट dopsportsrecruitment.in वर जाऊन अर्ज करू शकतात. जारी केलेल्या माहितीनुसार ही भरती क्रीडा कोट्यातील उमेदवारांसाठी आहे. या अंतर्गत उमेदवार 27 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. पोस्ट आणि एकूण जागा ➡️येथे एकूण २५७ पदांसाठी ही भरती करण्यात आली आहे. यामध्ये पोस्टल असिस्टंटसाठी ९३, शॉर्टनिंग असिस्टंटसाठी ९, पोस्टमनसाठी ११३ आणि एमटीएससाठी ४२ जागांची भरती केली जाणार आहे. पात्रता आणि वयोमर्यादा ➡️पोस्टल असिस्टंट/पोस्टमन या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी उत्तीर्ण असावेत. पोस्टल असिस्टंट/पोस्टमनसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे आणि MTS साठी १८ ते २५ वर्षे असावे. तसेच SC/ST ला पाच वर्षे, OBC तीन वर्षे, PWD सामान्य श्रेणी १० वर्षे, PWD SC, ST १५ वर्षे, PWD OBC १३ वर्षे सूट मिळेल. पगार ➡️पोस्टल असिस्टंट, शॉर्टिंग असिस्टंटसाठी वेतनश्रेणी रुपये २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये आहे. पोस्टमनचे वेतनमान २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना वाचणे आवश्यक आहे. ➡️ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख - २७ नोव्हेंबर २०२१ अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-कृषी जागरण, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
20
इतर लेख