AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पोस्ट ऑफिस मध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी!
नोकरीAgroStar
पोस्ट ऑफिस मध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी!
➡️भारतीय पोस्ट ऑफिस द्वारे तब्बल 44 हजार पदाकरता मेगा भरती होणार आहे. जे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आहेत, त्यांनी अर्ज भरण्याची ऑनलाईन लिंक सक्रिय झाल्यानंतर अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी सोमवार, 15 जुलै 2024 पासून नोंदणी सुरू झाली आहे.यासाठी तुम्हाला इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. याच वेबसाईटवरुन तुम्हाला भरतीसाठी अर्ज करता येईल, तसेच, इथून मंडळनिहाय रिक्त जागांची संपूर्ण माहिती देखील मिळेल. ➡️तर तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे..indiapostgdsonline.gov.in या लिंक वरती क्लिक करून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे. ➡️कोणाला करता येणार अर्ज? - मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. - वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे. - तुम्ही ज्या प्रदेशासाठी अर्ज करत आहात त्या प्रदेशाच्या भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. - यासोबतच सायकल कशी चालवायची हे देखील जाणून घेतले पाहिजे. - दहावीमध्ये इंग्रजी आणि गणित हे विषय अनिवार्य आहेत. - ही पदं ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्ट मास्तर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर यांची आहेत. ➡️पोस्ट ऑफिसच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची सुरुवात ही 15 जुलैपासून करण्यात आलेली आहे तसेच अंतिम तारीख 5 ऑगस्ट दिलेले आहे. ➡️यासाठी आपल्याला दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे तसेच ही परीक्षा थेट मुलाखती द्वारे म्हणजेच आपल्या दहावीच्या गुणोत्तर नुसार घेतली जाणारे यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नाही. ➡️संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
1